न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- किरकोळ अपघातानंतर झालेल्या वादातून एकाने प्रवासी दाम्पत्याला दगडाने मारहाण केली. तसेच, पतीसमोर हात धरून महिलेचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) रात्री आठच्या सुमारास सूस येथे घडली.
याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन खेडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला पतीसोबत कारमधून जात असताना सूस रोड येथे आरोपी खेडेकर याची दुचाकी त्यांच्या कारला धडकली. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून चिडलेल्या खेडेकर याने महिला आणि त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, महिलेचा हात धरून तिच्याशी अश्लील वर्तन केले.











