न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- महामेट्रोचे ठेकेदार अल्फा इन्फ्रा कंपनीच्या वल्लभनगर येथील कार्यालयाच्यासमोर कामगारांनी थकीत पगार देण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले आहे.
रविवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. कंपनीने ७५ कामगारांना ६ महिन्यांपासून पगार न देता केवळ एक-दोन महिन्याचा पगार देऊन काढून टाकण्याचा प्रयत्न केला. १ मे रोजी या कामगारांनी उपोषण आंदोलन केले. ३ मे रोजी या कामगारांना ३५ लाख रु दिले. उर्वरीत थकीत ९० लाख पगाराची रक्कम देण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.











