न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत उपस्थितीसाठी बायोमेट्रिक थम्ब प्रणाली सुरू केलीआहे. तरीही अनेक अधिकारी व कर्मचारी शिस्तीचे पालन करीत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भात पूर्वी अनेकदा आदेश व परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
नेमून दिलेल्या वेळेत नियमित उपस्थित राहावे. थम्ब इम्प्रेशन करून हजेरीपत्रकावर सही करणे. कार्यालयात प्रवेश करताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. पदानुसार नेमून दिलेला गणवेश परिधान करावा. गणवेश परिधान न करणाच्या कर्मचा-यांवर विभागप्रमुखांनी कारवाई करावी. कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरू नये, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
एका महिन्यात ३ किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस थम्ब इम्प्रेशन उशिराने केल्यास १ किरकोळ किंवा अर्जित रजेची नोंद करून कारवाई करावी. या कारवाईची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुख व शाखाप्रमुखांना दिले आहेत.











