- शेकडो बक्षिसांसह स्टार कलाकारांची उपस्थिती..
- मोठ्या संख्येने उपस्थित रहा; स्नेहा रणजित कलाटे यांचे महिलांना आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. 28 नोव्हेंबर 2025:- रणजित (आबा) कलाटे फाउंडेशन आणि अध्यक्षा स्नेहा रणजित कलाटे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर, जगताप डेअरी आणि पिंपळे निलख परिसरातील महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा – सन्मान स्त्रीशक्तीचा” या भव्य महा लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रंगला पंजाब हॉटेल शेजारील मैदान, डी.पी. रोड, विशालनगर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या स्पर्धेत प्रथम बक्षिस म्हणून पाच टू-व्हीलर स्कूटर, द्वितीय बक्षीस पाच ४३” इंची एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस पाच वॉशिंग मशीन, चतुर्थ बक्षीस फ्रीज, तर पाचवे बक्षीस पाच मिक्सर ग्राइंडर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मानाच्या १०० पैठण्या आणि कार्यक्रमास उपस्थित कुपनधारक महिलांसाठी विशेष भेटवस्तूंची सोय करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर व सेलेब्रिटी अँकर आर.जे. अक्षय यांची उपस्थिती लाभणार आहे.
स्नेहा रणजित कलाटे यांनी, ““महिलांनी घर, काम आणि समाज या तिन्ही आघाड्यांवर केलेले योगदान अपार आहे. त्यांच्यातील ऊर्जा, क्षमता आणि स्वाभिमानाचा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. हा कार्यक्रम केवळ बक्षिसांचा नाही तर स्त्रीशक्तीच्या गौरवाचा आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढवा.” असे आवाहन केले आहे.
कुपन भरण्याची अंतिम तारीख : २८ नोव्हेंबर २०२५,
अधिक माहितीसाठी : 9552510025 / 7028750025.
कुपन केंद्रे : १) स्नेहा रणजित कलाटे जनसंपर्क कार्यालय, पिंक सिटी रोड, वाकड
२) शहीद तुकाराम ओंबाळे उद्यान, वेणू नगर, वाकड
३) शिव गणेश दुर्गा मंदिर, कस्पटे वस्ती
४) गणपती चौक, विशालनगर
५) रंगला पंजाब हॉटेल शेजारील मैदान, विशालनगर
६) पिं. चिं. महानगरपालिका शाळा, पिंपळे निलख गावठाण.












