- प्रभाग क्रमांक २७ मधील लाडक्या बहिणींसाठी मनोरंजन व बक्षिसांची मेजवानी..
- युवा नेते देविदास (आप्पा) तांबे यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खास प्रभाग क्रमांक २७ मधील लाडक्या बहिणींसाठी ‘न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम देविदास (आप्पा) सुमन गुलाबराव तांबे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला असून महिलांसाठी मनोरंजन, सन्मान आणि आनंदाचा उत्सव ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन व सादरीकरण ओम यादव करणार असून ‘खेळ खेळा पैठणीचा आणि जिंका आकर्षक बक्षिसे’ या संकल्पनेतून महिलांना सहभागी करून घेतले जाणार आहे. उपस्थित लाडक्या बहिणींसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये टू-व्हीलर, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज आणि मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कापसे लॉन्स, रहाटणी येथे होणार आहे. लकी ड्रॉसाठी कूपन अगोदर कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ फॉर्म जमा करण्यासाठी देविदासआप्पा तांबे जनसंपर्क कार्यालय, रामनगर व काळेवाडी फाटा, रहाटणी येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी देविदास (आप्पा) तांबे यांनी प्रभागातील सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करताना सांगितले की, “हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून महिलांना एकत्र आणणारा आणि सन्मान देणारा उपक्रम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी साधावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ८३८१००६८६४, ८८०५४८८२५३, ९६९६२७१९१९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


















