न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- काळेवाड़ी परिसरातील थेट नळजोडला विद्युतपंप जोडून पाणी खेचणारे १७ विद्युतपंप पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले आहेत.
ही कारवाई सोमवारी (दि. ३) रोजी करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनखाली कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे व मीटर निरीक्षक चरखा, प्लंबर पिलाणे यांनी ही कारवाई केली. शहरातील इतर भागांतही या प्रकाराची कारवाई केली जाणार आहे.











