न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू ऊर्फ हिरानंद आसवानी यांच्या घरासमोर उभे राहून चौघांनी शिवीगाळ केली. तसेच, गेटमधील वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवली. ही घटना रविवारी (दि. २) रात्री साडेतीनच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथे घडली.
याप्रकरणी अमित हिरानंद आसवानी (२३, रा. शनिमंदिरासमोर पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा ऊर्फ बॉक्सर (रा. मिलिंदनगर, पिंपरी), व्यंकटेश नाईक, आदित्य साळवे (वय आणि पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित हा माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांचा मुलगा आहे. तो रविवारी रात्री व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पिपरीतील शास्त्रीनगर येथे गेला होता. तेथून परत आल्यानंतर तो घराच्या गेटवर उभा होता. त्यावेळी आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी आले.











