न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- परिसरात दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आले आहे. पिंपरी पोलिसांनी सोमवारी (दि. ३) रोजी ही कारवाई केली.
चारुदत्त हिराचंद खुडे (२८, रा. काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव), आशिष ऊर्फ गोल्डन मिलिंद हिवाळे (२१, रा. पिंपरीगाव), लहू ज्ञानेश्वर तिकोणे (४८, रा. काळेवाडी), तुषार बाबू मंजाळकर (२४, रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही आरोपींवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमुळे परिसरात त्यांची दहशत पसरली होती. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये तडीपारीची कारवाई केली आहे.











