न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगवी येथील शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण अडवणूक केली जात आहे. त्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे अभ्यासिकेमध्ये प्रवेश दिला जात नाही. या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
हुशार, होतकरू तरुणांसाठी शहरात विविध ठिकाणी पालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी या केंद्रामधून अभ्यास करून, स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करतात. परंतु, सांगवीतील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमध्ये येऊ नका, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे.
याविषयीची तक्रार साने यांनी आयुक्तांकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. केंद्रात प्रवेश बंद केल्याने दोन वर्षे त्यांनी केलेली मेहनत वाया जाईल, अशीभूमिका साने यांनी व्यक्त केली आहे.











