न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने चिखलीतील १७ चालू अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
गट क्रमांक १४७५, चिंचेचा मळा, श्रीराम हाउसिंग सोसायटी भागातील एकूण ११ हजार ६६९ चौरस फूट आकाराचे बांधकाम पाडण्यात आले. सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ६ बीट निरीक्षक यांच्यासह पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.











