न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
यातील स्पर्धकांनी दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये यश मिळविले आहे. या स्पर्धेमधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक गाजत आहेत. या स्पर्धेचे अर्ज सर्व्हे क्रमांक १६४, मनीषा स्मृती निवास, भोईरनगर, चिंचवड येथे उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३ जुलैपर्यंत आहे. सकाळी १० ते सायंकाळी सात यावेळेत अर्ज स्वीकारले जातील.
ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, हर्षवर्धन भोईर, मानसी भोईर, सुषमा बो-हाडे यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेचे संगीत संयोजन मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधाचे वादक करतील. या स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे असा आहे.











