न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- विश्व हिंदू परिषद आयोजित दुर्गवाहिनी संचलन रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल करु नयेत, अशी मागणी विमेन हेल्पलाईनच्या वतीने निगडी पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थीनी स्वरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. तसेच त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचे सादरिकरण करताना मुलींनी तलवार व एअर फायर केले होते. त्यामुळे या मुलींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले तर, या मुलींचे भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे रॅलीमध्ये सहभागी झालेल्या २५० विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल करु नयेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.











