- देहूरोड येथे इफ्तार पार्टी उत्साहात; हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती
- सामाजिक सलोख्यासाठी पार्थदादा पवार युवा मंचचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. ४ जून २०१९) :- मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पार्थदादा पवार युवा मंच आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. देहूरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात सोमवारी (दि. ३) रोजी सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली.
यावेळी पार्थ अजित पवार, पार्थदादा पवार युवा मंचचे अध्यक्ष अशपाक शेख, तळेगावचे नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण झेंडे, देहूरोड महिला शहराध्यक्ष शीतल हगवणे, अल्पसंख्याक अध्यक्ष शंकर स्वामी, सामाजिक कार्यकर्ते अमीन शेख, अक्षय वाघमारे यांच्यासह देहूरोड मधील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले, ”सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी यांसारख्या उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाज नेहमीच माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. हा समाज यापुढे देखील माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहिल याची मला खात्री आहे. माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या. तुमच्या अडी-अडचणीला मी धावून येईल. तुमच्या सुख दु:खात मी नेहमीच सहभागी असेल”.
कार्यक्रमाच्या संयोजनात पार्थदादा पवार युवा मंचचे सर्व पदाधिकारी व देहूरोड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला











