- मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल..
- या प्रभागातील इच्छुकांसाठी मार्गदर्शन बैठक सोमवारी…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३ डिसेंबर २०२५) पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण १ (निवडणूक नियम) मधील नियम क्रमांक ८ अन्वये ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत इच्छुक उमेदवारांना सविस्तर माहिती देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ यांच्या वतीने सोमवारी (दि. २२ डिसेंबर २०२५) सकाळी ११ वाजता मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ मधील सर्व इच्छुक राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, रहाटणी-१७ येथे होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून तयारीला अंतिम स्वरूप दिले जात आहे.












