न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड मनपा व शहरातील पर्यावरणप्रेमी व नागरी संस्था यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक ५ जून २०१९ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पीटल पुलाजवळील, विसर्जन घाट, हॉटेल रिव्हरव्यु मागे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास मा. महापौर, मा. आयुक्त व मनपाचे इतर पदाधिकारी यांचेसह शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक व यामध्ये काम करणाऱ्या विविध संस्था त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच मा.श्री. विरेंद्र चित्राव, KVFF, पुणे. यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ व संरक्षण तसेच ‘नदी प्रदूषणा’ बाबत मार्गदर्शन देणेकामी उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता यांनी केले आहे.











