न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ५ जून २०१९) :- सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने शहरातील तीन्ही मतदारसंघातील पदाधिका-यांची बैठक गुरूवार (दि. ६) रोजी भोसरीतील एका हॉटेलमध्ये आयोजित केल्याचे सूत्रांकडून समजते.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विजयी अमोल कोल्हे यांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक माजी आ. विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. ३) रोजी शरद पवारांना बारामतीत भेटले.
यावेळी शिरूर आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मावळ लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी यावेळी दिले आहेत.















