न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- केस कापण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलावर दोन जणांनी चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास निगडी येथे घडली. समाधान दत्तात्रय केंदळे (१७, रा. ओटास्कीम निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे.
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार लखन सातव (वय २५), नितीन चंदनशिवे (२३, दोघे रा. ओटास्कीम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आतेभावासोबत केस कापण्यासाठी हेअर सलून मध्ये गेला. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी समाधान याला ”तू आमच्याकडे का पाहिलेस”, असे म्हणून शिवीगाळ केली व हेअर सलून मधून बाहेर ओढ्न चाकूने वार केला. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.














