- राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होणार चुरशीची लढत..
- या उमेदवारांना मिळाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ३० डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. ३०) रोजी प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी आपापले पॅनल जाहीर करून उमेदवारी अर्ज सादर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता थोपटे, सागर कोकणे, अश्विनी तापकीर आणि सुमित डोळस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मजबूत संघटन, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि मतदारांशी थेट संवाद या तीन मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रवादी निवडणुकीस सामोरे जात आहे.
तर, भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे आणि अर्चना तापकीर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विकासाची कामे, रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा मांडत भाजप पुन्हा सत्तेचा दावा करताना दिसत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग २७ मध्ये भाजपचा पूर्ण पॅनल विजयी झाला होता. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक चुका टाळून नव्या जोमाने रणांगणात उतरण्याची तयारी केली आहे. दरम्यान, मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, ट्रॅफिक आणि कचरा व्यवस्थापन हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही पक्षांचे पॅनल तोडीस तोड असल्याने या प्रभागात अटीतटीच्या लढतीची शक्यता नाकारता येत नाही. प्रचाराचा धडाका वाढणार असून, मतदार कोणावर विश्वास ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.












