न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- रमजाननिमित्त मोठ्यांसह लहान मुलांनीही उपवास पकडून आदर, आस्था व करुणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या रोजा (उपवास) पकडणाच्या लहानग्यांचे चिंचवड स्टेशन येथील ‘शमा ए दिनो आदब’ मशिदीत कौतुक व सत्कार करण्यात आला.
मशिदीचे मौलाना मोहसीन सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार घालून व वह्या भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आदर आले. याप्रसंगी मोहम्मदसाज शेख, अब्दुलमतीम मेमन, अब्दुलकयुम मेमन, निहाल कुरेशी, जाहीद इनामदार, मोहसीन मुल्ला, मशिदीचे अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फिरोज पठाण, जहीर सय्यद, राजमंहम्मद अत्तार, निहाल मोहसीन शिकलगार, आशरफ जमादार, गुलाम अली भालदार आदी उपस्थित होते.











