न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि. ५) रोजी भूगोल फाऊंडेशनच्या वतीने य मोशी, संतनगर येथील पेठ क्रमांक ४ मधील दसरा चौकात चिंच व वटवृक्षाच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकांमध्ये वृक्षांविषयी आपुलकीची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशाने चिंच-वटवृक्ष विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवड करावी, त्याचे संगोपन करावे, प्लॅस्टीक व थर्माकोलचा वापर टाळावा, सुका कचरा, ओला कचरा-याचे नियोजन करावे तथा प्रदूषण नियंत्रणासाठी सायकलाचा वापर करावा, असा संदेश यावेळी देण्यात येणार असून तसा संकल्पही करण्यात येणार आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.















