न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- मूद्दलीच्या कित्येक पट व्याज वसूल करुनही कर्जदाराची वाहने जबरदस्तीने नेणा-या व्याजखोर सावकाराला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
आठ लाख रुपये व्याजाने घेतल्यानंतर व्याजाच्या बदल्यात २७ लाख ५० हजार रुपये देऊनही, चारचाकी व दुचाकी जबरदस्तीने व्याजापोटी काढून घेतल्याचा प्रकार भोसरी येथे ३ जून रोजी उघडकीस आला आहे. निलेश प्रकाश मेहता (वय ३४, रा. आळंदीरोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन सुनिल धर्मा पवार (वय ३७ रा. काळेवाडी) या सावकाराच्या विरोधात भादंवि कलम ३९२, ५०६ यासह महाराष्ट्र सावकार कायदा २००४ क ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.













