- हर्षद सुरेश नढे यांच्या प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचारात भाजपच्या उमेदवारांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे संघटन मजबूत झाले असून बुधवारी झालेल्या प्रचारात वेगळाच जोश पाहायला मिळाला. “आमची भाजपा – आपली भाजपा” या घोषणांनी परिसर भारावून गेला.
भाजपचे उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी सहउमेदवार नीता पाडळे, विनोद जयवंत नढे, कोमलताई सचिन काळे यांच्यासह विविध कॉलनींमध्ये प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला. युवकांसाठी क्रीडांगणे, चांगले रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीटलाइट, सार्वजनिक सुविधा आणि रोजगाराभिमुख उपक्रम यावर त्यांनी भर दिला.
प्रचारादरम्यान युवक मंडळे, गणेश मंडळे तसेच महिला बचत गटांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. विकासासाठी सक्षम, प्रामाणिक आणि जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
पारदर्शक प्रशासन, जलद विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी कमळाला मतदान करून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन हर्षद सुरेश नढे यांनी केले.












