- थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षा सोडविण्याची दिली हमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अधिक गती घेत आहे. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगरमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांनी अनिताताई कैलास थोपटे यांच्यासोबत बुधवारी शिवराजनगर आणि तापकीरनगर परिसरातील सोसायटींमध्ये प्रचार केला.
या प्रचार फेरीदरम्यान अश्विनीताई तापकीर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रभागातील नागरी सुविधा, महिलांसाठी आवश्यक सोयी, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि परिसराच्या नियोजित विकासावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “लोकांशी सतत संपर्कात राहणारा आणि प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद देणारा प्रतिनिधी देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान सोसायटी प्रतिनिधी, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली. प्रभागातील विकासकामांचा अनुभव आणि भविष्यातील स्पष्ट दिशा यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले. येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ या चिन्हाला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन अश्विनीताई तापकीर यांनी केले.












