अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जानेवारी २०२६) :- विद्यार्थ्यांमध्ये योगसाधना, शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्थैर्याचा संस्कार रुजवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून महापालिका व खासगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवासाठी नावनोंदणी २२ ते २४ जानेवारीदरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मोरया गोसावी क्रीडांगण येथे तसेच ९४२२२३१५६९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर करता येणार आहे. मुख्य कार्यक्रमास २५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.












