- दिघीतील मॅग्झीन चौकात काय घडल?…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- दिघी परिसरातील मॅग्झीन चौक येथे सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी–आळंदी रोडवरील प्रगती लॉजसमोर घडली.
याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आर्यन देसाई (वय २६) या तरुणीने फिर्यादी तसेच इतर नागरिकांशी अश्लील शब्दांचा वापर करत अश्लील हावभाव केले. तसेच फिर्यादीच्या अंगावर हात फिरवून सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
महिला आरोपीस नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करत आहेत.












