- मग राजस्थान व महाराष्ट्रातून कारवाई; हाती लागले फक्त १.८० कोटीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराची तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत १ कोटी ८० लाख रुपये होल्ड करण्यात आले आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हानुसार आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी तक्रारदाराकडून पैसे घेतले; मात्र कोणताही परतावा दिला नाही. तपासादरम्यान अॅक्सिस बँकेतील संशयास्पद खात्याचा मागोवा घेत पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई व राजस्थान येथे कारवाई केली.
अभय पाटील, शिवतेज पोटे, महेश उडचणे, राहुल मौर्य, युवराज उर्फ संतोष मुदलीयार, पंकज गिरीगोस्वामी व प्रल्हाद गाडरी या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.












