न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये पालखी तळावर कीर्तन, भजन, जागर करणाऱ्या वारकऱ्यांना मोफत पाण्याचे टॅकर, तंबू, भजन आदी साहित्य देऊन सेवा केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा वारकरी संप्रदायाच्यावतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ह. भ. प. रामहरी कस्पटे यांनी ३६ वर्ष पांडुरंगाच्या मंदिरामध्ये विण्याची सेवा केल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम, आळंदी ; श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प मारुती कोकाटे, शांताराम महाराज निम्हण, मृदुन्गाचार्य पांडुरंग अप्पा दातार, ह.भ.प. बाळासाहेब जाधव, ह.भ.प. वसंत कलाटे, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मयुर कलाटे आदी उपस्थित होते.
अरुण पवार हे गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा करीत आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या दरम्यान पालखी तळावर कीर्तन, भजन , जागर करणाऱ्या वारकऱ्यांना मोफत पाण्याचा टॅकर, तसेच तंबू व भजन साहित्य देतात. भंडारा डोंगर येथे दोन वर्ष वृक्षलागवड करून व त्याचे बाराही महिने संगोपन करून झाडे जतन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी आजपर्यंत पि.चिं. शहरात लावलेली रोपे, तसेच महापालिकेकडून लावण्यात आलेल्या रोपांना देखील मोफत पाणी पुरवठा करतात. अनावश्यक खर्च टाळून वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळीना, तसेच जेष्ठ नागरिकांना भेट म्हणून रोपे व भजनी साहित्य भेट म्हणून देण्यात येते. या सर्व सेवेबद्दल त्यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.














