न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- वडिलांनी घरात दारूची बाटली उलटी ठेवलेली पाहिली, दारूची घेतली टेस्ट महागात पडली. पहिला घोट घातक ठरला. बाटलीच्या एका टोपणभर दारूने माझे सगळे आयुष्य उध्वस्त झाले. अट्टल बेवडा बननो. बायकोला त्रास देत गेलो. लहान मुले घेवून ती बांगड्या विकून संसाराचा गाडा चालवायची. मी मात्र माझ्या कामाच्या पैशावर दारू पिणे आणि मटका खेळण्यात पैसे उडवायचो. आता बायको सोडून गेली, तीन लहान मुले मझ्यापासून दुरावली.एकीला (दारूला) धरून बसलो तर दुसरीने (बायकोने) हात सोडला. आज एकटाच पुण्यात जीवन जगतोय. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस संस्थेत आल्यावर ६ महिन्यानंतर माझी दारू सुटली. तुम्ही देखील दारूपासून मुक्त होवू शकता. असा विश्वास पूर्वाश्रमीचे अट्टल मद्यपी लातूरचे विनायक यांनी व्यक्त केला.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या संस्थेच्या वतीने मद्यपींसाठी आकुर्डी येथे जनजागरण सभेचा सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये सुमारे ११० सहभागी झाले होते. चिंतामणी एन यांनी प्री अँबल वाचन केले. ‘मद्यपाश एक आजार’ शिवा एन यांनी अनुभवातुन सांगितला. ए. ए. या संस्थेची स्थापना, तिचे कार्य या विषयी माहिती दिली.
मद्यपाश एक कौटुंबिक आजार या विषयावर श्रीमती अनुराधा करकरे मँडम यांनी मार्गदर्शन केले. एलँनाँन सदस्या श्रीमती प्रणिता यांनी त्यांचे अनुभव सांगितले. मद्यपाश या आजारावरील उपाययोजना गोपी बी. यांनी अनुभवातुन सांगितली.
सूत्रसंचालन सचिन एम यांनी केले. तर आभार धनंजय पी यांनी मानले.














