न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- सांगवीतील मधुबन कॉलनीमध्ये गुंठेवारी पद्धतीने केलेल्या अनधिकृत बांधकामावर, महापालिकेतर्फ कारवाई करण्यात आली. जुनी सांगवी येथे अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे.
राहत्या घरावर झालेल्या कारवाईने नागरिक मात्र पुरेसे धास्तावले. महापालिकेतर्फे जुनीसांगवी येथील मधुबन गल्ली क्रमांक एकपासून नऊपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी दिली.
यावेळी कार्यकारी उपअभियंता हेमंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका अतिक्रमण पथकाचे पंधरा पोलिस व तीन जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.














