न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण ९ हजार ७६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ७६३ पदे रिक्त आहे. या पदाची भरती करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पालिकेची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावरील कामकाजाचा ताण वाढला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सेवा व नागरी सुविधा पुरविण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. पालिकेचा आस्थापना खर्च ३२ टक्के आहे. असे असताना पालिका प्रशासन खुल्या वर्गातील तसेच, मागासवर्गीयांच्या अनुषेश भरत नसल्याचे चित्र आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
पालिका प्रशासनाने रिक्त पदाची तातडीने भरती करावी, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र माने, उपाध्यक्ष दीपक काथवटे व सचिव ज्ञानेश्वर इंगावले यांनी केली आहे.














