न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशभरातील अनेक ठिकाणांहून ‘ ईव्हीएम ‘ बाबत संशय व्यक्त होत आहे . मतदान प्रक्रियेवरील हा संशय लोकशाहीसाठी घातक असल्याने मतदान प्रक्रिया ‘बॅलेट पेपर’ वरच झाली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
भोसरी येथे विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून ‘ ईव्हीएम ‘ बाबत संशयाचे वातावरण आहे. पाच मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आम्ही आता निवडणूक आयोगाकडे आमची मागणी लावून धरणार आहोत.


















