न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिचवड महापालिकेने नगरसचिव उल्हास जगताप यांना सहायक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त (दोन) चा पदभार देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या बाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी (दि. ६) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३९ – ए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करणे व ही पदे भरण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.
दिलीप गावडे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (दोन) हे पद रिक्त झाले आहे. आज झालेल्या महासभेत नगरसचिव उल्हास जगताप यांना सहायक आयक्तपदी बढती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (दोन) चा पदभार सोपविण्यास मान्यता देण्यात आली.


















