न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- फर्निचर आणि अन्य वस्तुंची कंपनी स्थापन करून, त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे, भासवून सहा नातेवाईकांनी एका व्यावसायिकांची पाच कोटी सात लाख रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार २५ मे २०१६ ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत वाकड येथे घडला. या प्रकरणी रमेश श्रीमंत घोलप (वय ५०, रा. गहुंजे, त . मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या दान घटनेत प्रदूम्न निर्मळ, गीता प्रदुम्न निर्मळ, श्रीहरी बापूराव निर्मळ, (सर्वजण रा. वाकड), गुरुलिंग ज्ञानोबा अंदिल, जयराम गुरुलिंग अंदिल (सर्वजण रा. भोसरी), दिनेश धुमाळ (रा. वाई जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा घेत दाखल करण्यात आला आहे. रमेश व इतर आरोपी नातेवाईक आहेत.


















