न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना विठ्ठल दातीर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सचिवपदी निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी किशोर इथापे यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे : सहसचिव एकनाथ अरसे (एच. ए. हायस्कूल, पिंपरी), मोहन वाघुले (महात्मा फुले विद्यालय, भोसरी), अशोक जाधव (किर्ती विद्यालय, निगडी), विद्याराणी वाल्हेकर (एस. एम. विद्यालय, काळेवाडी), उपाध्यक्ष संभाजी पडवळ (समता विद्यालय, भोसरी), उर्मिला थोरात (ज्ञानराज विद्यालय, कासारवाडी), खजिनदार सूर्यकांत कडू (शिवभूमी विद्यालय, निगडी), विद्यासचिव नयना जगताप (सुबोध विद्यालय, चिंचवड), दयानंद सोनकांबळे (ज्ञानदीप विद्यालय, रूपीनगर), अंतर्गत हिशोब तपासणीस हनुमंत मारकड (गुरू गणेश विद्या मंदिर विद्यालय, निगडी), सल्लागार राधेशाम मिश्रा (गोदावरी हिंदी विद्यालय, आकुर्डी) यशवंत पवार (प्रेरणा विद्यालय, थेरगाव), सतिश गवळी (मॉडर्न हायस्कूल, निगडी), सूर्यकांत भसे (ज्ञानदीप विद्यालय, रूपीनगर)


















