न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- जेएनएनयूआरएम-बीएसयुपी योजनेंतर्गत उभारलेल्या वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील उर्वरित दोन इमारतीतील २२४ सदनिकांचे ताबे लाभार्थ्यांना नुकतेच देण्यात आले आहे. आता या प्रकल्पातील फक्त ४८ सदनिकांचे वाटप बाकी आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात एकूण १२ इमारती उभारण्याचे नियोजन होते. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सीमित झाल्याने ९ इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पात एकूण १ हजार ४४० सदनिका उभारण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात १ हजार ८ सदनिकांचे बांधकाम करण्यात आले. प्रकल्पातील ७३६ सदनिकांचे वाटप यापूर्वी करण्यात आले होते.














