न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ७ जून २०१९) :- शिरूर लोकसभा मतदारसंघात अति-तटीच्या झालेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा थोडक्या मताधिक्याने पराभव झाला. पराभवाचे शल्य फार काळ उराशी न बाळगता माजी खा. आढळराव यांनी मतदारसंघातल्या नियमित कामकाजाला सुरुवात केली आहे.

भोसरी मतदारसंघातील संपर्क कार्यालयास त्यांनी गुरुवार (दि. ६) रोजी भेट दिली. यादरम्यान त्यांनी मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला.
नेहमी प्रमाणेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
निवडणुकी अगोदर ज्याप्रमाणे नागरिकांचा राबता कार्यालयात असे, त्याप्रमाणेच निवडणुकीनंतरही नागरिकांची गर्दी कार्यालयात पहावयास मिळाली. यावेळी भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, बीएसएनएल सदस्य दत्तात्रय भालेराव व आदी उपस्थित होते.


















