- पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ७ जून २०१९) :- पालकमंत्री गिरीश बापट यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार (दि. ७ जून) रोजी दिली आहेत.
पुण्यातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी स्थानिक आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावांची पालकमंत्रीपदासाठी जोरदार चढाओढ सुरू झाली होती.
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिकांपैकी एखाद्याची निवड केल्यास अन्य नेत्यांची नाराजी ओढविण्याची भीती होती. तसेच आणखी एखाद्या आमदारास मंत्रीपद द्यावे लागणार होते. हे टाळण्यासाठी विद्यमान मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे हा पदभार सोपविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधान्य दिले.


















