न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतानाच, आज दुपारी साडेचार नंतर आकाशात दाट धुळीचे सावट पसरले होते. रस्त्यावरील अस्ताव्यस्त पडलेला कचरा, कागद, प्लास्टिक व माती उडून, रस्त्यावरील नागरिकांच्या डोळ्यात जात होती.
तसेच पिंपरीतील मुंबई-पुणे महामार्गावरील वाहन चालकांनादेखील वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. तसेच मध्येच धुळीचे वावटळ उडून, वाऱ्याच्या वेगाने रस्त्यावर पसरत होते.
सुरुवातीला आकाशात ढग जमा होऊन, पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, अचानक बदललेल्या वातावरणाचे धुळीमध्ये परिवर्तन होऊन, धुळीची लाट निर्माण झाली. क्षणार्धात धुळीने समोरचा रस्ता अदृश केला. पावसाने मात्र, पिंपरी चिंचवडकरांना धक्का देत, अचंबित केल्याचे पहावयास मिळाले.


















