न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत चिखली भागामध्ये भव्य संतपीठ उभे राहत आहे. यात चिखलीतील व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष (ह. भ. प.) आनंदा महाराज यादव यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, चिखलीतील संतपीठ विषयामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. तसेच, त्यांची कार्यकारिणीचे दौरे आणि नंतर सत्तारूढ पक्षनेते व भारतीय जनता पक्षाने दुसरी कार्यकारिणीही केली त्याला विरोध झाला आणि आत जी कार्यकारिणी होणार आहे ती जनरल मिटींगमध्ये होईल, असे बोलले जात आहे.
चिखली गावाला संप्रदायाचा वसा आणि वारसा आहे. श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले. त्यावेळेस त्यांच्या हातातील टाळानी चिखली गावात प्रस्थान केले. म्हणून या गावाला टाळगाव चिखली, असे म्हणतात. चिखली गावाची टाळगाव चिखली या नावाने प्रसिध्दी, गावाची दिंडी महाराजांच्या सोहळयाबरोबर रथाच्या मागे क्रमांक. ३८. वर चालते. देहुपासुन-पंढरपूरपर्यंत ३०० भावीक पायी चालतात. त्याची सर्व व्यवस्था दिंडीच्या वतीने केली जाते. चिखली गावामध्ये टाळसाठी भव्य मोठे मंदिर आहे. तेथे प्रत्येक एकादशीला किर्तनाचा कार्यक्रम होतो व देहुच्या एकादशी आळंदीहुन दिंडया देहुला टाळाचे दर्शन घेवुन जातात व आळंदीच्या एकादशीला देहूहुन टाळमंदिरात विश्रांती घेवुन दिंडया पुढे मार्गस्थ होतात. अशा अनेक दिंडया व वारकारी टाळमंदिरात ये जा करीत असतात. अशा संप्रादायाचा वसा व वारसा असलेल्या टाळगाव चिखलीमध्ये संतपिठ होत आहे.
त्या संतपीठावर गावाच्या वतीने चार हरीभक्त (ह. भ. प.) संधी द्यावी, अशी मागनी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष (ह. भ. प.) आनंदा महाराज यादव यांनी केली आहे. आमच्या गावामध्ये ह. भ. प. धार्मिक कार्यक्रम भजन किर्तन व जागरण असे कार्यक्रम नियमानुसार चालतात. त्यामुळे गावाचे गावपण जपलेले आहे. त्याचा आदर करूण हा निर्णय घ्यावा, हि विनंती करण्यात येत आहे.
कारण महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता दत्ता काका, किडा समितीचे सभापती संजय नेवाळे तसेच बाल कल्याण समितीचे सभापती स्विनल म्हेत्रे ही सर्व नगरसेवक मंडळी चिखली गावच्या आहेत. म्हणून वरील निर्णय लवकरात लवकर घेवून, चिखली गावाला न्याय द्यावा ही विनंती. नाहीतर उग्र आंदोलन केले जाईल आणि ते गावाला न्याय मिळेपर्यंत केले जाईल, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष (ह. भ. प.) श्री. आनंदा महाराज यादव व गावक-यांच्या वतीने करण्यात येत आहे, असे यादव यांनी या निवेदनात म्हटले आहे.


















