न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ शालेय व प्रत्येकी २ पी. टी. गणवेशाचे वाटप १७ जूनपूर्वी करण्यात येणार आहे. सदर गणवेश खरेदी ९ वर्षे कालावधीसाठी करण्यास पूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सहा वर्षे गणवेश खरेदी करूनच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. त्यास पालिका सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. ७) रोजी मंजुरी देण्यात आली.
दिल्ली महापालिकेच्या शाळेत सुमारे ८ हजार ३५४ विद्यार्थी आहेत. त्यांना दरवर्षी दोन शालेय गणवेश व २ पी. टी. गणवेश मोफत दिले जातात. संबंधित पात्र ठेकेदारांकडून ९ वर्षे गणवेश वाटप करण्यास तत्कालिन अतिरिक्त आयुक्तांनी २१ एप्रिल २०१६ ला मान्यता दिली होती. त्यानुसार पुरवठादाराकडून करारनाम्याकरिता ९ वर्षे कालावधीसाठी मुद्रांक शुल्क भरून घेण्यात आले आहे.
त्यामुळे सदर करारनामा व आदेश रद्द न करता स्थायी समितीने २८ फेब्रुवारी २०१९ ला गणवेश खरेदीस मान्यता दिली आहे. सदर गणवेश १७ जूनपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्याची कार्यवाही करावी, अशा उपसूचनेला पालिका सभेत मंजुरी देण्यात आली.


















