न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी (दि. ७) रोजी जारी केला. महामंडळातर्फे मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते.
महामंडळाचे सुमारे ३०० कोटीचे बजेट आहे. गोरखे यांच्या रुपाने पहिल्यांदाच महामंडळाला उच्चशिक्षित आणि युवा अध्यक्ष मिळाला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी गोरखे यांची नियुक्ती झाली आहे.
निवडीबाबत गोरखे म्हणाले, की महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विकासासाठी निधी दिला जाईल. समाजाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांना शिक्षणासाठी मदत केली जाईल.


















