न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- दारू पिताना झालेल्या वादातून एकाला हॉटेलच्या मॅनेजर आणि वेटरने लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ५) रात्री मोशी येथे घडली. याप्रकरणी जयेश विजय सावंत (३१, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजदूत हॉटलच्या मॅनेजर आणि वेटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जयेश आणि त्यांचा मित्र अंकुश हे दोघे बुधवारी रात्री मोशीतील हॉटेल राजदूत येथे दारू पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, दारू पिताना आरोपी आणि त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी जयेश यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

















