न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर विटी दांडू असोसिएशनतर्फे भव्य विटू दांडू संघ आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पिंपरी येथील एचए मैदानावर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंना नियम व अटींची माहिती देण्यात आली.
यावेळी प्रमोद पायगुडे, निवृत्ती काळभोर, अंजली व्हर्टी उपस्थित होत्या. गल्लीतला खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याबाबत विटू संघटनेचे सभासद विलास मोरे यांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, रविवारी (दि. ९) महाराष्ट्र विभागामार्फत संघाची निवड करण्यात येणार आहे. सर्व विटीदांडू प्रेमींनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


















