न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- महापालिकेतील अधिकारी नागरिकांच्या निवेदनाचा विचार करत नसून त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने महत्वाची कामे रखडली आहेत. बेजबाबदार अधिका-यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भीम संग्राम संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या मिळकती असलेल्या क्रिडांगण, उद्यान व कार्यालये याठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारला जावा, यासाठी नगरसेवकांकडून ठराव संमत करण्यात आला आहे. तरी, सुद्धा यावर आमंलबजावणी करण्यात येत नाही.
यासंदर्भात चार लेखी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अधिकारी आश्वासनेच देत आहेत. अशा अधिका-यांवर तातडीने कारवाई करावी व सविधान प्रास्ताविकेच्या शिलालेखासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी मागणी वड़मारे यांनी निवेदनामार्फत केली आहे.
















