न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मार्च २०२६) :- डुडळगाव रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना आमिष दाखवत वेश्या व्यवसायासाठी बोलावल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी ५२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास डुडळगाव रोडवरील एका कापड दुकानाजवळील आडबाजूच्या सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (दिघी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
संबंधित महिला सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींना “चल येतोस, ५०० रुपये दे, चांगली सर्व्हिस देते” असे म्हणत अश्लील हावभाव करून ग्राहकांना आमिष दाखवत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस करत आहेत.












