- मोटार वाहन न्यायालयाचा निर्णय…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात मोटार वाहन न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक ३४ वर्षीय इसम मद्यप्राशन करून वाहन चालवत असताना अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात आढळून आला होता.
सदर प्रकरणी भोसरी वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम १८५ व १८४ अन्वये कारवाई करून खटला शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात पाठविला होता.
२८ मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंड, तसेच कलम १८४ अंतर्गत ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.








