न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- गोकुळ हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्याने १७ जानेवारी रोजी महिलेला फोनकरून सांगितले की, तिच्या पतीने दीड लाख रुपये घेऊन दिघी मधील मॅगझीन चौकात बोलावले आहे. त्यानुसार पीडित महिला घरातील दीड लाख रुपये घेऊन मॅगझीन चौकात गेली.
आरोपीने तिला तिथल्या एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेने आणलेले दीड लाख रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेला. हा प्रकार १७ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत मॅगझीन चौक दिघी येथे घडला.
याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोकुळ गिरी (रा. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.














