न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी सिनेकलाकर प्रज्ञा श्रीमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रज्ञा पाटील यांना मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर उपसंघटक म्हणून दत्ता घुले, तुकाराम शिंदे, दीपक भालेराव, शिवनाथ दिल्पाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.














