- पीएमआरडीए मुख्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १५ एप्रिल २०२६) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, स्वातंत्र्य व बंधुत्वावर आधारित विचार आधुनिक भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया आहेत, असे प्रतिपादन पीएमआरडीएचे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांनी केले. आकुर्डी येथील मुख्यालयात जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बागडी म्हणाले, आंबेडकरांचे विचार भविष्यातील सशक्त भारताची दिशा ठरवणारे असून संविधानाधारित राष्ट्रदृष्टी आजही मार्गदर्शक आहे.
यावेळी सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, कार्यकारी अभियंते वसंत नाईक, शिवकुमार कुपल, उपअभियंता प्रशांत जोशी, कनिष्ठ अभियंता जितेंद्र पगार, कक्ष अधिकारी विशाल ताठे, स्वीय सहाय्यक स्वप्नील बुलबुले, माहिती अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, वरिष्ठ लिपीक पांडुरंग मधुरकर उपस्थित होते. प्रशांत जोशी यांनी जीवनकार्यावर अभिवाचन केले.











