न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर हे ११ ते २३ जून असे १३ दिवस वैद्यकीय उपचारासाठी रजेवर आहेत.
महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने त्यांच्याकडील कार्यभार नगरसचिव उल्हास जगताप व सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे कायदा सल्लागार तर, बोदडे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन (झोनिपु) विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि. ११) रोजी दिले आहेत.














